मित्रांचा मित्र अनिरुद्ध
परमपूज्य अनिरुद्ध बापू (डॉक्टर अनिरुद्ध धै. जोशी) ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ (अनिरुद्ध पौर्णिमा) रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख.
डॉ.अनिरुद्ध धै. जोशी.
जन्म :त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६
पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.
माता : सौ. अरुंधती जोशी.
पिता : डाँ. धैर्यधर जोशी.
संगोपन : आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित.
(माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये)
विशेष प्रभाव : माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये
(बापूंच्या पणजी)
शालेय शिक्षण : डाँ. शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई
माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत
एस. एस. सी. - इ. स. १९७२
वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई
(टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)
एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८
एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२ .
मी असा आहे आणि मी तसा आहे - मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे. पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे? ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱया त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवरदेखिल अवलंबून नाही.
बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही.
भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती.
सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे व म्हणूनच असत्य, द्वेष आणि दुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे;
ह्याचाच अर्थ, हे कार्यदेखील आपोआपच घडत असते. कारण जो स्व-भाव आहे तो आपोआपच कार्य करीत राहतो, त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही.
प्रभुरामचंद्रांचा मर्यादायोग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्रीसाईनाथांचा मर्यादाधिष्टित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे.
माझी बांधीलकी 'वास्तवाशी' म्हणजेच स्थूल सत्याशी नसून, ज्याच्यात पावित्र्य उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे.
माझ्या मित्रांनो, पवित्रता व प्रेम ह्या दोन नाण्यांना मी विकला जातो, बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे, ह्या अनिरुद्धाचा 'मी' फक्त तुमचा आहे, तो माझा कधीच नव्हता आणि कधीही नसेल.
------------------------------------------
श्री अनिरुद्ध ,नंदाई आणि सूचित दादा हेच आमचे सर्वस्व आणि २०२५ साली रामराज्य आणणे हेच आमचे ध्येय .........आम्हाला जो आनंद मिळतोय , जे प्रेम , सुख आणि आधार मिळतोय तो तुम्हालाही मिळावा हेच ह्या ब्लॉगमागील उद्दिष्ट .....हरी ओम...........